Breaking News

श्री संत सावता माळी युवक संघाने दत्तक घेतलेल्या मुलाचा गौरव !

श्री संत सावता माळी युवक संघाने दत्तक घेतलेल्या मुलाचा गौरव
करंजी प्रतिनिधी- 
      कोपरगाव तालुका श्री संत सावता माळी युवक संघाने संवत्सर येथील जनता इंग्लिश  स्कुल मधील  इ ५ वी ते १० वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या हुशार व गरजु १२ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले असून त्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च कोपरगाव तालुका श्री संत सावता माळी युवा संघ करत आहे अशी माहिती श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी दिली आहे.
    सदर उपक्रम हा श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे  यांच्या प्रेरणेतुन राबविन्यात आला येत असून या उपक्रमास मुत्ताबाई दशरथ काळे यांच्या स्मरणार्थ डॉ.ऊषाताई दोडीया,प्रभाकर सुमंतराव काळे यांच्या स्मरणार्थ निलेश काळे व हेमंत दत्तात्रय ससाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
     जनता इंग्लिश स्कूल  संवत्सर या शाळेत शिक्षण घेणारा शत्रुघ्न शाम त्रिभुवन याने  नुकत्याच लागलेल्या १० वीच्या परीक्षेत ७०% मार्क मिळवत यश संपादन केले आहे. त्याचा या यशा बद्दल  श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदन व सत्कार करून त्याचा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  या छोटेखानी सत्कार समारंभात श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हा अध्यक्ष  मुकुंद मामा काळे, प्रगतिशील शेतकरी रत्नाकर काका काळे, प्रशांतजी ससाणे उपस्थित होते.