Breaking News

मथुरा, काशीच्या संकल्प पूर्तीसाठी संघटित रहा : पं. महेश व्यास

मथुरा, काशीच्या संकल्प पूर्तीसाठी संघटित रहा : पं. महेश व्यास 
बेलापुर प्रतिनिधी :
बेलापूरचे भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर गाव आणि परिसरात रामभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.रा. स्व. संघ,विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पंचक्रोशीतील कार सेवकांचा गौरव करण्यात आला.
विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ,तालुकाध्यक्ष बाळासाहेब हरदास व रा. स्व. संघाचे श्रीरामपूर तालुका कार्यवाह विजय ढोले, पं. महेश व्यास यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन १९९०-९२ च्या अयोध्येतील कारसेवेसाठी सहभागी असलेल्या पंचक्रोशीतील कारसेवकांचा गौरव करण्यात आला.
डॉ. शिरसाठ यावेळी म्हणाले की, जगातील साऱ्या संस्कृती लयास गेल्या मात्र भारतीय संस्कृती पिढ्यानपिढ्या आजही समृद्ध होत आहे. यातुन तिची महती दिसुन येते. त्या आधारेच भारत अधिक मजबूत होत आहे.
पं. महेश व्यास यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतील भाषणाचा धागा धरुन सर्वांनी आपले मनमंदिर मजबुत करण्याचा सल्ला दिला. यापुढे मथुरा, काशी असे आणखी काही संकल्प पूर्ण करण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्वश्री पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, रविंद्र कोळपकर, विष्णुपंत डावरे,आदींनी मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सर्वश्री दिलीप काळे, रामप्रसाद व्यास, उपसरपंच रविंद्र खटोड,अशोक गवते,शेखर डावरे,संजय नागले, ज्ञानेश्वर कुलथे, रविंद्र जाधव,हरी वैद्य, लक्ष्मण शिंदे,ज्ञानदेव सिनारे,संजय सिनारे,कचरू शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गणेश मंत्री व अभिषेक दुधाळ यांचाही सन्मान करण्यात आला.
नटवर सोमाणी यांनी मधुर वाणीतून "मंदिर वही बनाएंगे"हे पद्य गायिले. सूत्रसंचालन माजी सरपंच भरत साळुंके यांनी केले.

बालाजी मंदिरात दिपोत्सव !
राष्ट्रसंत स्वामी पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास तथा गोविंद देव गिरी यांनी उभारलेल्या पेठेतील बालाजी मंदिरांसह नव्या बालाजी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन लक्षवेधी दिपोत्सव आणि आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गाव आणि परिसरात अन्य मंदिरे आणि घरापुढे रांगोळ्या काढून आपल्या भावना अयोध्येपर्यंत  पोहोचविल्या.