Breaking News

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील जनतेसाठी एक हजार बेडचे हॉस्पिटल !

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील जनतेसाठी एक हजार बेडचे हॉस्पिटल
-------------
पारनेर तालुक्यात 1000 बेडचे राज्यातील पहिले सेंटर
-------------
कोरोना च्या संकट काळात आमदार निलेश लंके याच्या निर्णयामुळे तालुक्यातील वाढत असलेल्या रुग्णांना दिलासा 
---------------
तालुक्यातील कोरोना रुग्णांचे या कोविड केअर सेंटरमध्ये होणार मोफत उपचार
--------------
पारनेर प्रतिनिधी :
       पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके व प्रतिष्ठानच्या माध्यमातून १००० बेडचे कोव्हिड सेंटरचा लवकरच लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार किवा आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्या उपस्थितीत दोन ते तीन दिवसात या १ हजार बेड असणारा कोव्हिड सेंटरचा  लोकार्पण सोहळा होणार आहे.
     राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंकेची यांनी  कोरोना रूग्णांना दिलासा देण्यासाठी नगर कल्याण महामार्गावर असणारा टाकळी  ढोकेश्वर - कर्जुले हर्या हद्दीवर असणारा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वखर्चाने  १ हजार बैडचे कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासबंधीची प्राथमिक पाहणी गुरूवारी  तहसीलदार ज्योती देवरे व गटविकास अधिकारी किशोर माने आ. लंके प्रतिष्ठानचे अँड राहुल झावरे रूग्ण पारनेर कल्याण समितीचे अशासकीय सदस्य डाॅ बाळासाहेब कावरे रूग्ण कल्याण समिती सदस्य पत्रकार शरद झावरे बाळासाहेब खिलारी भैय्या वलगुडे यांनी पाहणी केली आहे या कोव्हिड सेंटर मध्ये महिलांची पण स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असुन तालुक्यातील रूग्णांची व्यवस्था याठिकाणी केले जाणार आहे. टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयाची पण तहसीलदार ज्योती देवरे व गटविकास अधिकारी किशोर माने  यांनी पाहणी केली असुन गरज पडली तर याठिकाणी कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 
     पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनापुढे पेच असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेची यांनी आपल्या लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून १ हजार बैडचे कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.आ.निलेश लंके यांच्या स्वखर्चातुन १ हजार  बेडचे राज्यातील पहिले कोरोना सेंटर टाकळी ढोकेश्वर मध्ये सुरू होत असुन यामुळे कोरोना रूग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली असल्याने १००० बैडचे रूग्णालय चालु करावे असे आवाहन माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी कालच ( गुरूवारी) केले होते. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद आमदार निलेश लंकेची यांनी तातडीने १००० बेडचे  कोव्हिड सेंटर स्वखर्चाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे.गुरूवारी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या वतीने महिलांसाठी १२० बेडचे अद्ययावत कोव्हिड सेंटर पारनेर महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता टाकळी ढोकेश्वरला हे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार असल्याने कोरोना रूग्णांना दिलासा मिळणार आहे. 


कोरोनाच्या संकटात आधार देण्यासाठी १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर- आमदार निलेश लंके
-------------
     तालुक्यातील ग्रामीण जनतेची गरज ओळखून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नगर कल्याण महामार्गावर असणारा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वखर्चाने अद्ययावत असे १ हजार बैडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे जागतिक संकट आपल्या सर्वांवर आले असुन मार्गदर्शन माजी आ नंदकुमार झावरे यांच्या अपेक्षेनुसार पारनेर तालुक्यात ५०० बेडच्या कोरोना सेंटरची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त केली त्यावर त्वरित निर्णय घेतला तसेच  पारनेरयासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न शील असल्याचे आ निलेश लंके यांनी सांगितले आहे. कोविड केअर जागेसाठी तातडीने प्रतिसाद देणारे डाॅ दिपक आहेर व मातोश्री शैक्षणिक संकुलाचे सचिव किरण आहेर यांचे आ.लंके यांनी कौतुक केले आहे.