Breaking News

अशी आहे मुंबईत परिस्थिती; वाचा मुद्देसूद आणि थोडक्यात

मान्सून अलर्ट: मुंबई महापालिकेने ...

मुंबई :

आज सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईत आणि उपनगर परिसरात लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज मुंबईसह कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईची तुंबई झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंसह चर्चा केली आहे आणि सर्वतोपरी सह्र्कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या ५ दशकांमधील विक्रमी पावसाची नोंद :-

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ४५ वर्षांत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा विक्रमी पाऊस आहे. काल मुंबईत दिवसभरात ३२८.२८ मिमी पावसाची नोंद केली गेली आहे.

अशी आहे परिस्थिती :-

  • पेडर रोड येथे केम्स कॉर्नरजवळ एक भिंत कोसळली असून अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत.
  • अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प; जनजीवन विस्कळीत
  • अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते.
  • मरीन लाइन्स परिसरात दर ताशी तब्बल १०१.४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता.
  • जे. जे रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले, पंप लावून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू
  • मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या साइनेजला वाऱ्याचा फटका
  • दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील अमीर हाऊस चाळीत तळ मजल्यावरील दुपारी साडेतीनपासून पाणी शिरण्यास सुरूवात झाली.