Breaking News

आरोग्य तपासणीसाठी कोपरगाव नगरपरिषदेला आमदार आशुतोष काळेंनी दिले आरोग्य साहित्य !

आरोग्य तपासणीसाठी कोपरगाव नगरपरिषदेला आमदार आशुतोष काळेंनी दिले आरोग्य साहित्य !


   कोपरगाव प्रतिनिधी - 
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी आरोग्य साहित्य दिले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गुरुवार (दि.२७) रोजी हे आरोग्य साहित्य स्वीकारले.
              मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येला आळा बसावा व कोरोनाची साखळी संपुष्टात यावी यासाठी शुक्रवार (दि.२८) पासून ३१ ऑगस्ट पर्यंत कोपरगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहे. या चार दिवसात कोपरगाव शहरातील प्रत्येक घरोघरी जावून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कोपरगाव नगरपरिषदेला आरोग्य साहित्य देण्यात आले आहे. यामध्ये २० पीपीई किट, १०० डिस्पोजेबल कॅप, १०० डिस्पोजेबल ग्लोव्हज, १०० एन ९५ मास्क, १०० फेस शिल्ड मास्क आदी साहित्याचा समावेश आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची माहिती द्यावी. आपल्या कुटुंबात व आपल्या शेजारील आजारी व्यक्तींची स्वत:हून माहिती द्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण कोरोनाला नियंत्रणात आणणार आहोत. आजारी रुग्णांवर तातडीने उपचार करून संभाव्य संकट टाळण्यासाठी व भविष्यात कोरोनाला अटकाव व्हावा म्हणून आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना केले आहे.
       यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, संजय तिरसे व कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी  उपस्थित होते.