Breaking News

कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव मध्ये कोरोना चा शिरकाव !

तालुक्यातील आंचलगाव मध्ये कोरोना चा शिरकाव !
करंजी प्रतिनिधी- 
   आज दि ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.४५ ला प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोपरगाव केअर सेंटर मध्ये एकूण ३४ संशयितांच्या रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी केली असता त्यात ४ पॉजिटीव्ह तर ३० अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
      यात तालुक्यातील कोरोना मुक्त असलेल्या आंचलगाव मध्ये एक ४६ वर्षीय पुरुष, पढेगाव येथे ६० वर्षीय पुरुष तसेच कोपरगाव शहरातील जानकी विश्व ६४ वर्षीय पुरुष व इंदिरा पथ भागात २९ वर्षीय पुरुष असे एकूण ४ रुग्ण दुपारच्या अहवालानुसार पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
    कोपरगाव तालुक्यातील आज दुपार अखेर  एकूण कोरोना रुग्णाची संख्या ३३४ झाली असली तरी आज रोजी २५ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असून आज पर्यंत तालुक्यातील १६१ रुग्ण कोरोना वर मात करून सुखरूप घरी परतले आहे.