Breaking News

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडू मातीपासून गणपतीच्या मुर्ती !

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडू मातीपासून गणपतीच्या मुर्ती !

 ( मसिरा मनियार, रेहान मेहतार या मुस्लिम विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समितीने केले कौतुक )


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
 कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव घरीच साजरा करण्याचे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशाबरोबरच एकता आणि अखंडता मंञ जपत शाडु मातीच्या श्री गणेशमुर्ती तयार करून आपआपल्या घरी बसविल्या, तालुक्यातील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातेे. व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोना महामारीमुळे सध्या भयंकर परिस्थिती उदभवलेली आहे, परंतु तरीही आपली धार्मिक परंपरा जपण्यासाठी रसायनिक रंग प्लॅस्टर आॕफ पॅरिस मुर्तीमुळे होणारे जलप्रदुषण टाळण्यासाठी पर्यावरण पुरक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा केली पाहिजे त्याच बरोबर अशा धार्मिक उत्सवाप्रसंगी जाती पातीचे भिंती नष्ट करुन एक विचाराने सण साजरी करावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन सौ रेणुका कोल्हे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शाडू गणेशमुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले, त्यांच्या या संकल्पनेला दाद देत एल.के.जी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्हीडीओ पाहुन घरच्या घरी शाडू मातीच्या मुर्ती बनविल्या. मसिरा मनियार,  रेहान मेहतार, 
वेदश्री दरेकर, कृष्णा म्हस्के, या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या श्री.गणेश मुर्तीची शाळेत स्थापना करण्यात आली. स्वतःच बनविलेल्या मुर्तींची प्रतिष्ठापणा केल्याचा वेगळाच आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलने हा उत्सव साजरा करतांना
एकता अखंडते बरोबर पर्यावरणाचाही संदेश देण्याचे काम केल्याने सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माजी मंञी शंकरराव कोल्हे , सदस्य बिपीनदादा कोल्हे, सदस्य माजी आमदार सौ. स्नेहलता  बिपीनदादा कोल्हे यांनी उत्कृष्ट मुर्ती साकारल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यात अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे , प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले