Breaking News

स्वत:च्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र : सुजय विखे

 Maharashtra Opposition Leader Congress Radha Krishna Vikhe Patil ...

अहमदनगर : 

'राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकासआघाडी सरकारची आहे. जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,' असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 'स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र आले आहे,' असा घणाघाती आरोपही सुजय विखेंनी केला.  

     'राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकासआघाडी सरकारची आहे. प्रत्येक वेळी केंद्रावर आरोप करणे चुकीचं आहे. केंद्र सरकारवर अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?' असा प्रश्न सुजय विखेंनी केला.

'जनतेने नाकारलेलं असताना महाविकासआघाडीने सरकार स्थापन केले. स्वतःच्या स्वार्थासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. मात्र जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,' असेही ते म्हणाले.

'कंपाऊडरला डॉक्टरांपेक्षा अधिक ज्ञान असते. त्यामुळे मी नेहमी डॉक्टरपेक्षा कंपाऊडरकडून गोळ्या घेणे पंसत करतो', असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले होते. त्यावरही सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली.

'खासदार संजय राऊतांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी. संजय राऊतांनी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा अवमान केला आहे. डब्ल्यू एचओ आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही,' असा प्रश्नही सुजय विखेंना उपस्थित केला आहे.

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबतचा विषय घरगुती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही,' असेही ते म्हणाले.