Breaking News

राजूर पोलीसांची अवैध धंद्यावर कारवाई !

राजूर पोलीसांची अवैध धंद्यावर कारवाई !


 राजूर प्रतिनिधी :-
      अकोले तालुक्यातील राजूर येथे देशी दारूची वाहतूक करतांना तिघांनी विक्रीसाठी आणलेली दारू जवळ बाळगली. हा प्रकार राजूर पोलिसांना समजला असता त्यांनी तात्काळ पथक पाठवून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे गाडी क्रमांक MH.48.A.4549 असा एकूण 2,31000 हजार रुपयांचा मुद्देमाल 120 लिटर दारु मिळून आली आहे. ही कारवाई राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार करत आहेत. दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले असून त्याच तिघांना आरोपी करण्यात आले आहे.निलेश अशोक घटकर व विक्रम अशोक घटकर राजूर अशी एका गुन्ह्यातील तर सागर दिलीप भारमल(रा. राहुलनगर,राजूर, ता.अकोले) असे आरोपी करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
       गेल्या काही दिवसांपूर्वी राजूर येथील शुक्ला गॅंग तडीपार करण्यात आली आहे. त्याच पाठोपाठ आता अवैध धंदे करणाऱ्यांवर देखील तोच पॅटर्न चालवला जाईल व दोन गुन्हे दाखल झाले तर अशा अवैध धंदे करणार्यांवर देखील हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले जातील.तर गणेश विसर्जनाच्या पार्शवभूमीवर राजूर व परिसरातील अनेक अवैध धंदे करणाऱ्यांवर तडीपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यातील काही आरोपी हे राजूर परिसरात त्यातील दोघे मोकाट फिरतांना आढळून आले असता त्यांच्यावर राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली आहे.
         तसेच गणपती उत्सव काळात राजूर गावातुन  21 आरोपी हद्द पार केले असून त्यातील 3 आरोपी गावात फिटरताना दिसले असता त्यांच्यावर पण भदवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे