Breaking News

कोरोना मुक्त झालेल्या बहीण भावांने कोपरगाव कोविड सेन्टर चे अनोख्या पध्दतीने व्यक्त केले आभार !

कोरोना मुक्त झालेल्या बहीण भावांने कोपरगाव कोविड सेन्टर चे अनोख्या पध्दतीने व्यक्त केले आभार 


करंजी प्रतिनिधी- 
     आज च्या वाढत्या कोरोना च्या महामारीत खरे कोरोना योद्धे असतील ते म्हणजे आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी जे अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटूंबापासून दूर राहत कोरोना रुग्णाची सेवा करत आहे त्यातूनच जे कोरोना मुक्त होणारे रुग्ण घरी जातांना या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आभार मानतात.
     असेच एक अनोखे उदाहरण म्हणजे नैतिक (वय ११ वर्ष ) व आरुषी (वय ९ वर्ष) हे बहीण भाऊ गेल्या पाच ते सहा दिवसापासून कोरोना वर कोपरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत होते येथील सर्व पेंशट वर बारकाईने नियमित लक्ष ठेऊन असणारे विशेष कोविड अधिकारी डॉ वैशाली बडदे कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर , कोपरगाव ग्रामिण वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असणाऱ्या कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना आज रविवार दि ३० ऑगस्ट रोजी कोरोना मुक्त होऊन घरी परतणाऱ्या या छोट्याशा बहीण भावांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात  प्रत्येक आरोग्य सदस्यास एक छानसा संदेश लिहून व  हाताने बनविलेले चित्र भेट म्हणून दिले.
    या संदेशाद्वारे त्यांनी खऱ्या अर्थाने जे कोविड योद्धे आहेत त्यांचे कौतुक करत आभार मानले आणि आज त्यांचा मुळेच आह्मी कोरोनावर मात करत पूर्ण पणे उपचार घेऊन बरे झालो आहोत अशा भावना व्यक्त केल्या जगभरातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य सेवकाविषयी  आदरयुक्त भावना व्यक्त करत एका आरोग्य सेविकाचे कुशीत भारताचा नकाशा रेखाटून हरेगा कोरोना जितेगा इंडिया संदेश लिहिला,  तसेच दोन हात दाखवून त्यात संपूर्ण जगाचा गोल दाखवून समस्त जगातील डॉक्टर व आरोग्य सेविकांचे कौतुक करत आज संपूर्ण जग आपल्या हातात सुरक्षित असून आपणांस निरोगी व उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देत या चिमुकल्या भाऊ बहिणींनी अनोख्या पध्दतीने सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
    त्यांचा या कृती ला बघुन कोपरगाव कोविड सेंटर मधील सर्व कर्मचारी भारावून गेले होते त्यांचा या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.