Breaking News

राजकारणा पेक्षा समाजकारण श्रेष्ठ - सुजित झावरे पाटील

राजकारणा पेक्षा समाजकारण श्रेष्ठ - सुजित झावरे पाटील
पारनेर/प्रतिनिधी :
आज सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारलेला खडकवाडी येथील लेंडीओढा बंधारा ज्या बंधाराची जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागातील सर्वांत जास्त उंचीच्या बंधारातील पाण्याचे जलपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    तसेच गावातील गावठाण चौक पेव्हिंग ब्लॉक बसविणे,गावठाण शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे,वाकचौरे दुकान ते गागरे गल्ली रस्ता काँक्रीटीकरणं करणे,भिल्ल वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे, बोरवाक शाळा शौचालय व पाणीपुरवठा वितरण,भिल्लवस्ती,गुंजदरा,भांबवस्ती स्ट्रीटलाईट करणे इ. विविध विकासकामांचे शुभारंभ संपन्न झाला. सन २०१८ मध्ये खडकवाडी गावातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचेकडे सदर बंधारासाठी निधी ची मागणी केली होती.काही महिन्यामध्ये सदर लेंडी ओढा बंधारा साठी निधी मंजूर करून काम ही करून दाखवले.व आज जिल्हा परिषद मधील सर्वात उंचीचा बंधारा म्हणून नोंद झाली आहे.
      यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, या गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,बंधारे, रस्ते समाजकल्याण मार्फत काँक्रीटीकरण, स्ट्रेट लाईट, वैयक्तिक लाभाच्या योजना,आदिवासी विभागा मार्फत रस्ते अनेक कामे झाली आहे. राजकारणा मध्ये माणसामाणसामध्ये काही कारण नसताना कटुता निर्माण होते. गावागावात गट निर्माण होतात त्यामुळे व्यक्तीदोष तयार होतो. म्हणून राज कारणा पेक्षा समाजकारण केव्हाही चांगले 
    यावेळी सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, किसन धुमाळ,मोहन रोकडे,सरपंच चिमाजी चिकणे,मारुती आग्रे गुरुजी चेअरमन, सुभाष ढोकळे गुरुजी, किसनराव ढोकळे, विठ्ठलराव रोकडे,संजय कर्णावट,विठ्ठलराव खणकर, बबनराव केदार, शिवाजी गागरे, कारभारी शिंगोटे, अनिल गागरे, छबु खामकर, बाबा महाराज खामकर, आंबादास गागरे, विश्वनाथ ढोकळे, बजरंग गागरे, नवनाथ बिचारे, विठ्ठल ढोकळे, अशोक ढोकळे, बाबासाहेब गागरे, रघुनाथ ढोकळे, धोंडिबा नवले, काशिनाथ केदार, अण्णासाहेब गागरे, दगडू रोहकले, भास्कर बर्डे, संतोष बर्डे, राजू ढोकळे, संतोष ढोकळे, उत्तम ढोकळे, तुषार साळवे, दत्ता गायकवाड, सोमनाथ गागरे, बाळासाहेब कुटे,भाऊसाहेब गागरे, राजेंद्र इघे, प्रकाशशेठ शेवते,आबा नवले, बबनराव ढोकळे, नारायण गागरे,विशाल गागरे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.