Breaking News

भेंडा ते कुकाणा रस्त्यावरील खड्डात झाड लाऊन जीवन ज्योत फाउंडेशन ची गांधीगिरी !

भेंडा ते कुकाणा रस्त्यावरील  खड्डात झाड लाऊन जीवन ज्योत फाउंडेशन ची गांधीगिरी !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
राज्य शासन कितीही 'खड्डेमुक्त महाराष्ट्र' होणार असे सांगत असेल तरी नेवासा फाटा ते शेवगाव  या रस्त्यांची मात्र वाट लागली आहे. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यांचा रस्ता  हेच लक्षात  येत नाही याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वाट पाहा,अशी भूमिका घेतना दिसून येत आहे. नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावरील खड्डे वाचवून  मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. सहा महिन्या पुर्वी कमलेश नवले यांनी बांधकाम खात्यांची प्रेत विधी आंदोलन करून काम करून घेतले पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्यांला वारंवार सांगून ही हे काम चांगले झाले नाही. नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यांची संपूर्ण बिकट परिस्थितीत झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना रस्तांवरून जाताना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने कित्येक  नागरिकांना अपंगत्व आले असून काहीना जीव गमवावा लागला आहे. नेवासा फाटा ते शेवगाव राज्य महामार्गची दुरावस्था  झाली असून लवकरात लवकर तत्काळ खड्डे बुजावेत अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या कार्यालयात घुसून दडुका आंदोलनाला समोरे जावे लागेल असा ईशारा जीवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून  सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरूस्तीसाठी पुढाकार घेत नसल्याने जीवन ज्योत फाउंडेशनने  गांधी गिरी करित रस्तावरील खड्डय़ात झाड लावून आंदोलन केले.या आंदोलनात कमलेश नवले संस्थापक जीवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र,खजिदार अक्षय बोधक,तालुका अध्यक्ष आप्पासाहेब आरगडे,
अभिजीत बोधक,पप्पू नाईक,जॉन बोधक, दिशांत बोधक,रोहित बोधक,बबलू कनगरे तरवडी,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.