Breaking News

कोपरगाव तालुक्यात १४ रुग्ण कोरोना बाधित तर १४ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात १४ रुग्ण कोरोना बाधित तर १४ कोरोनामुक्त !
करंजी प्रतिनिधी-
     आज दि २१ ऑगस्ट रोजी कोपरगाव केअर सेंटर मध्ये २६ रॅपिड टेस्ट केल्या असता त्यात १४ पॉजिटीव्ह तर १२ निगेटीव्ह आले असून आज १९ संशयितांचे स्वाब नगर येथे पाठवण्यात आले आजे तसेच आज  तालुक्यातील १४  कोरोना रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
    यात कोपरगाव शहरातील टिळकनगर-१, लक्ष्मीनगर-१, महादेव उद्यान जवळ-१, कासली वाल कंपाउंड-१, ब्राम्हणगल्ली-१, गांधीनगर-३, दत्तनगर-१, संजयनगर-१ तर कोपरगाव ग्रामीण मध्ये शिंगणापूर--२ तर कोळपेवाडी-२ असे एकूण १४ रुग्ण सापडले आहे.
   आज पर्यंत तालुक्यातील एकून रुग्णाची संख्या ५६४ तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७२ झाली आहे.