Breaking News

आमदार निलेश लंके म्हणाले राजेश्वरी कोठावळे यांचे क्रिडा क्षेत्रातील काम उल्लेखनीय !

आमदार निलेश लंके म्हणाले राजेश्वरी कोठावळे यांचे क्रिडा क्षेत्रातील काम उल्लेखनीय !
---------------
राष्ट्रीय क्रिडा दिवसा निमित्ताने पारनेर येथे महिला खेळाडूचा सन्मान !


पारनेर/प्रतिनिधी :
      राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर अंतर्गत तालुका क्रीडा समिती, पारनेर आयोजित पारनेर तालुक्यातील आता पर्यंत विविध क्रीडा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम पारनेर येथे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके व पारनेर व श्रीगोंदा तालुका क्रीडा अधिकारी नवांदे सर यांच्या  प्रमुख उपस्थित संपन्न झाला.  यावेळी श्री हॉरीझॉन स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र च्या संस्थापक अध्यक्षा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू राजेश्वरी कोठावळे तसेच होळकर सर, दुधाडे सर, संदिप कावरे व महिला खेळाडू पल्लवी थोरात, निकिता औटी, मयुरी झरेकर, आरती शेळके, कीर्ती शेळके, सानिया शेख, शिवानी कावरे, तसेच शौर्य शेळके, अंकुश होले, गणेश होले, आदी खेळाडू उपस्थित होते.
  
     यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले पारनेर तालुक्यात राजेश्वरी कोठावळे सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत असलेल्या खेळाडू असून त्यांनी तालुक्यातील अनेक महिला खेळाडूना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले आहे ही एक अभिमानाची बाब आहे आशा प्रतिभावान खेळाडू साठी येत्या काळामध्ये आपण नक्कीच  एक सुसज्ज असे क्रिडा संकुल पारनेर शहरामध्ये तयार करणार आहोत असे आश्वासन दिले. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या.