Breaking News

नेवासा शहरासह तालुक्यात बुधवारी ९ पुरुषांसह ३ महिला कोरोना बाधीत, ५ दिवसांमध्ये ४ कोरोनाबाधितांचा मृत्यु !

नेवासा शहरासह तालुक्यात  बुधवारी ९ पुरुषांसह ३ महिला कोरोना बाधीत, ५ दिवसांमध्ये ४ कोरोनाबाधितांचा मृत्यु !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा तालूक्यात बुधवार (दि.१९) रोजी नव्या १२ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ५ दिवसांमध्ये ४ जणांचा कोरोना या संसर्ग आजाराने मृत्यु झाला असल्याची माहीती तालूका आरोग्य विभागाच्या सुञांनी दिली.
      तालूक्यातील १२ नव्या रुग्णांमध्ये नेवासा खुर्द ४, देवसडे येथील १, मुकिंदपूर १, भालगांव १,खडका १, शिंगवेतुकाई १, मोरेगव्हाण १, भानसहिवरे १, सोनई १ अशा १२ रुग्णांची वाढ झाली आसून त्यामध्ये ९ पुरुषांसह ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती सुञांनी दिली.
      तालूक्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ५१८ असून त्यामध्ये ३९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०७ रुग्णांवर उपचार सुरु असून १४ रुग्णांचा मृत्यु झालेला असल्याची माहिती नेवासा तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी  यांनी दिली आहे.