Breaking News

आंबेडकरांच्या आंदोलनाला सरकार घाबरले

सामाजिक जीवनाला सुरूवात करा – प्रकाश आंबेडकर | Corona fight- Prakash  Ambedkar urges people to start social life

 - पंढरपूरकडे येणारी एसटी सेवा बंद

- एक लाख भाविकांसह आंबेडकर विठ्ठल मंदिरावर धडकणार

सोलापूर/ प्रतिनिधी

राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी एक लाख भाविकांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोर्चा काढण्याच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या इशार्‍याचा राज्य सरकारने प्रचंड धसका घेतला आहे. वंचितच्या होणार्‍या या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी सेवा बंद करण्यात आली असून, एसटी सेवा बंद करण्याचे आदेशच जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे  नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी  पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करण्यात येणार आहे. करोनाच्या नावाखाली सरकारने विनाकारण धार्मिकस्थळे बंद ठेवल्याचा दावा करत वंचितने हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सोमवारी  पंढरपुरात वारकर्‍यांनी गर्दी करू नये आणि त्यामुळे करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पंढरपूरमध्ये येणार्‍या सर्व एसटी सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विठ्ठल मंदिर परिसरात दहा फूट उंचीचे लोखंडी बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. कुणीही मंदिरात प्रवेश करू नये म्हणून हे बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपुरात पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.

पंढरपुरात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तावर वंचित बहुजन आघाडीने सडकून टीका केली. कितीही रेलिंग किंवा बॅरिकेटिंग करा आम्ही विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे यांनी दिला आहे. आम्ही रेलिंग तोडून मंदिरात प्रवेश करू. विठ्ठलाचा दरबार उघडला तर राज्यातील करोना पळून जाईल. त्यामुळे सरकारने मंदिरे खुले करावीत, अशी मागणीही चंदनशिवे यांनी केली.

------------------------