Breaking News

नेवासा शहर आठ दिवस लॉकडाऊन, नेवासा तालुक्यात २२ रुग्णांची वाढ एकाचा मृत्यू !

नेवासा शहर आठ दिवस लॉकडाऊन, नेवासा तालुक्यात २२ रुग्णांची वाढ एकाचा मृत्यू ! 
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा शहरासह तालूक्यात कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव मोठा वाढत चालला अाहे. गुरुवार (दि.६) रोजी तालूका आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात तालुक्यातील माळीचिंचोरा येथील एकाचा कोरोणामुळे मृत्यू झाला असून २२ नविन रुग्ण कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले असून २८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.                                नेवासा शहरात आज पुन्हा १० रुग्णांची भर पडली असल्याने नेवासा शहर शनिवार दि. ०८ पासून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यात  नेवासा   बुद्रूक ३ ,बेल्हेकरवाडी ४,धनगरवाडी १,खेडले काजळी २,नारायणवाडी १ तर उस्थळ दुमाला येथे एका रुग्णांची वाढ झालेली आहे. 
    नेवासा तालूका आरोग्य विभागाला आलेल्या आहवालात आजपर्यंत तालूक्यातील ३०५ रुग्णांपैकी २०८ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असून ९० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहीती तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली. तर यापुर्वी कोरोनावर 
उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यु झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आलेले आहे.