Breaking News

अकोल्यात आज पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा कोरोना बळी !

अकोल्यात आज पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा कोरोना बळी !
अकोले प्रतिनिधी :
    अकोले तालुक्यात आज दिवसभरात  पुन्हा तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे 
     आज बुधवारी सकाळीअगस्ती  कारखाना रोडवरील एका ७१ वर्षीय  व्यक्ती  चा कोरोनाने  बळी घेतला घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असताना  त्याचा मृत्यू  झाला आहे.आज खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अमृतनगर,नवलेवाडी, हिवरगाव आंबरे,व कळस येथील प्रत्येकी एक असे तिन व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे.यामध्ये  नवलेवाडी येथील अमृतनगर येथील ७६ वर्षीय  पुरुष, हिवरगाव आंबरे येथील ५८ वर्षीय  पुरुष तर कळस येथील ३७ वर्षीय  पुरुष अशा  तिन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तर आज दिवसभरात खानापुर कोविड सेंटर येथे बाधितांच्या संपर्कातील ५१ व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले असुन ते अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे 
तालुक्यातील एकुण बाधितांची  संख्या ३२६ झाली असून .त्यापैकी २३० व्यक्ती कोरोनामुक्त झाले.८७ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ०९ व्यक्ती मयत झालेल्या आहे.
-------