Breaking News

नेवासा तालूक्यात कोरोनाचा 'कहर' सोनईत १२ तर नेवासा खुर्द येथे नवे ८ रुग्ण !

नेवासा तालूक्यात कोरोनाचा 'कहर' सोनईत १२ तर नेवासा खुर्द येथे नवे ८ रुग्ण ! 
  --------
तालुक्यात आज नविन ३५ रुग्ण तर तालुक्याचा कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७०० पार !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा 'कहर' वाढतच चालला आहे. हा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढत चालल्यामुळे नेवासकरांची धाकधूक वाढली आहे आरोग्य खाते कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सज्ज असतांना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्यामुळे कोरोनाच्या महामारीत नेवासकर अकडले आहेत. आता पोलिसांनीच हातात दंडूका घेवून सार्वजनिक गर्दीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. अन्यथा संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका नेवासकरांच्या मानगुटीवर बसण्याची अधिक शक्यता नाकारता येत नाही.
    शनिवार (दि.२९) रोजी तालूका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहीतीमध्ये तालुक्यात आज सर्वाधिक ३५ रुग्ण कोरोनाबाधीत झाल्याने नेवासकरांची पाचावरधारण बसली आहे तर १० रुग्णांनी कारणांवर मात केली आहे. ३५ रुग्णांमध्ये सोनई १२, तर नेवासा खुर्द ०८, खामगांव नं.२ मध्ये ०२, गेवराई ०२, शनिशिंगणापूर ०२, मोरेचिंचोरे ०२, बेलपिंपळगांव ०१, पानसवाडी ०१, चांदा ०१, तामसवाडी ०१,घोडेगांव ०१, बेल्हेकरवाडी ०१ तर म्हसले येथील एका रुग्ण असे तालूक्यात नवे ३५ रुग्ण आढळल्याने मोठी धाकधुक वाढली आहे. तालूक्यातील एकूण कोरोनाबाधीतांचा अाकडा ७१४ झाला आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सार्वजनिक गर्दी टाळणे गरजेचे अाहे. मास्क अन् सॅनिटायझरचा वापर करुन कोरोनाची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे मतही सुज्ञ नागरीकांतून बोलले जात आहे.