Breaking News

सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत - नगराध्यक्ष वहाडणे !

सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत - नगराध्यक्ष वहाडणे !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठी घबराट उडालेली आहे.दररोज रुग्ण संख्या वाढत असून अनेक बळी पडताहेत.अनेक परिवार कोरोनापिडीत झाल्यामुळे
जनता सैरभैर झालेली आहे.शासन प्रशासनाची भूमिका पुन्हा लॉकडाऊन करण्याची नाही.पण धोका वाढलेला आहे हे शंभर टक्के सत्य असल्याचे मत नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे व्यक्त केले.
. प्रसिद्धीस दिलेल्या पञकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले  आहे की   पुन्हा जनता संचारबंदी लागू करावी कि नाही यासाठी विचारविनिमय करण्यासाठी  दि 11 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयात व्यापक बैठकही घेतली होती.शहराचा प्रथम नागरिक म्हणून अशा संकटात सर्वांशी चर्चा करावी हा एकमेव हेतू होता. कुठलाही निर्णय सहमतीने व्हावा असे मला नेहमीच वाटते.एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही.त्या बैठकीत उपस्थित व्यक्तींपैकी काहींनी जनता संचारबंदी करावी असे मत मांडले तर अनेकांनी आर्थिक अडचणी वाढतात म्हणून संचारबंदी सध्या नको असे विचार मांडले.पण आता संपुर्ण कोपरगाव शहरच कोरोनाग्रस्त होते कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे.जनतेत, छोटे मोठे व्यावसायिक,व्यापाऱ्यात घबराट उडालेली आहे.ज्या कुटुंबात रुग्ण असतात त्यांची मानसिक व आर्थिक ओढाताण फारच भयानक आहे.गरिबांनी उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हाही प्रश्नच आहे.
            कोणत्याही नागरिकांचा कोरोनामुळे अकाली बळी जाऊ नये,कुटुंब उघड्यावर येऊ नये यासाठी खरे तर आता जनता संचारबंदीची गरज आहे असे मला तरी वाटते. पण काहींना माझे म्हणणे मान्य नसेल तर माझा कुठलाच आग्रह नाही.
सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत.निदान या परिस्थितीत तरी एकमेकांवर टिका टिप्पणी करून कुणीही वातावरण दुषित करणे योग्य होणार नाही.अहमदनगर मध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला दोन दोन दिवस नंबर लागत नाही.आपल्या कोपरगाववर अशी परिस्थिती येऊ नये इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.ज्या कुटुंबातील काही बळी गेले,जे कोविडग्रस्त ऍडमिट आहेत त्यांच्या मनस्थितीचा व शहरावर आलेल्या या भीषण परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करावा हिच अपेक्षा.या विषयावर कुणी माझ्यावर टिका केली तरी हरकत नाही,कारण कुणी अकाली बळी जाऊ नये हिच इच्छा असल्याचेही नगराध्यक्ष  विजय वहाडणे यांनी म्हटले आहे.