Breaking News

कुसडगाव येथे आईसह तीन मुलींचा विहीरीत पडुन मुत्यू , तालूक्यात हळहळ !

कुसडगाव येथे आईसह तीन मुलींचा विहीरीत पडुन मुत्यू :
तालूक्यात  हळहळ :
जामखेड प्रतिनिधी :
 तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेचा तीन मुलींसह विहीरीत मृतदेह आढळून आले आहेत. सायंकाळी उघडकीस आलेल्या या दुर्दैवी घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने 
मृतदेह बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
स्वाती राम कार्ले  (वय ३०) या महिलेसह तिच्या कोमल राम कार्ले  (वय ६), सायली राम कार्ले (वय ९) ,अंजली राम कार्ले (वय ११), या तीन मुली सर्व रा कुसडगाव अशी मयतांची नावे आहेत. मयत महिला शेतात दुपारी काम करण्यासाठी गेली होती. तिच्या सोबत तीन मुली देखील होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत हे चारही जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुसडगाव - भोगलवाडी शिवारातील विहीरीत आईसह महीलेच्या तीनही मुलींचा मृतदेह आढळून आले. मात्र घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजु शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच दादासाहेब सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सदरची घटनेची माहिती फोनद्वारे मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी देखील घटनास्थळी तातडीने धाव घेतली. एक तासानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरी बाहेर काढले. आईसह तीनही लहान मुलींचे मृतदेह विहिरीत अढळुन आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.