Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना...

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना..

दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या ठरू पाहत आहे प्रशासनाची डोकेदुखी.
कोळगाव प्रतिनिधी : योगेश चंदन
      श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा कहर थांबता थांबत नसून आज दिवसभरात तपासणी केलेल्या रुग्णांपैकी 12 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यात श्रीगोंदा शहरात 8 रुग्ण, लिंपणगाव येथे 3 तर घारगाव येथे 1 नवीन रुग्णाची संख्या वाढली असून तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 281 झाली आहे तर 195 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर 86 सध्या उपचार घेत असून तालुक्यात आत्तापर्यंत तीन जण मृत्यू पावले आहेत.
        घारगाव येथील कोरोनाची साखळी ८ दिवसापूर्वीच संपली होती मात्र आज पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे एका कंपनी मध्ये कामासाठी जात होता तेथून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी माहिती दिली.