Breaking News

जवळ्यात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटारीचे पाणी नदीत !

जवळ्यात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटारीचे पाणी नदीत!
---------
गटारीचे पाणी नदीत सोडल्यामुळे नदी दूषित.
---------
ग्रामस्थांनी प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिले निवेदन.
----------
आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा!


पारनेर प्रतिनिधी -
      जवळा तालुका पारनेर येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटार योजनेचे सांडपाणी गावाच्या जवळून वाहणाऱ्या सिद्धेश्वर नदित सोडण्यात आले आहे. यामुळे या नदीवर असणाऱ्या पाचही बंधाऱ्यांचे पाणी प्रदुषित होत आहे. जवळ्यातील मेन पेठ येथील गटार योजनेचे पाणी प्राथमीक शाळेजवळील बंधाऱ्यात दोन वर्षापुर्वी सोडण्यात आले होते. त्यामुळे हा बंधारा पुर्णपणे दुषित झाला आहे. या बंधाऱ्यालगत मोठी दलित वस्ती आहे. त्याचा प्रचंड त्रास येथील लोकांना होत आहे.त्यांनी विरोध करूनही येथे सांडपाणी सोडण्यात आले आहे.   
     गावाशेजारील ईतरांसाठी सध्या मोठ्या गटार योजनांचे काम अंतिम टप्यात आहे. या सर्वांचे पाणी गावातील सिद्धेश्वर नदित सोडण्यात येत आहे. परंतु येथील पठारे मळा , सालके मळा , तिकोने मळा , ढोकळे मळा , खबडी मळा ग्रामस्थांनी त्यास विरोध केला आहे. याबाबतचे दीडशे ग्रामस्थांच्या साह्य चेे निवेदन प्राादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रन मंडळ अ. नगर यांना देण्यात आले. सांडपाण्याच्या प्रदुषणामुळे जवळा हद्दीत या नदीवरील पाचही बंधारे दुषित होवून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होईल ,त्यामुळे सांडपाणी सोडण्यास ग्रामपंचायत जवळे यांना मनाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


गावच्या मध्यातुन वाहणाऱ्या या नदिला कुकडी प्रकल्पाचे पाणी नियमीत सोडले जाते , संपुर्ण जवळा गाव या नदिमुळे बागायती झालेले आहे. गावच्या विस्तारानुसार प्रदुषण पातळीही पुढे वाढत जावून मोठी समस्या निर्माण होणार आहे. सांडपाणी नदीत सोडण्याच्या दुष्परीनामांचा कोणताही विचार ग्रामपंचायतने केला नाही.व विराध करूनही जर पाणी नदित सोडले तर आंदोलन करू असा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.