Breaking News

महावितरनाचे गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान ; पारनेरच्या अर्जुन शेगोकार यांना पुरस्कार !

महावितरनाचे गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान ; पारनेरच्या अर्जुन शेगोकार यांना पुरस्कार !


पारनेर :-
महावितरण कंपनीच्या वतीने दर वर्षी प्रमाणे देण्यात येणारा गुणवंत कामगार पुरस्कार यावर्षी पारनेर अर्जुन शेगोकार यांना तर अहमदनगर मधील अशोक पांगरे ,पंकज बारब्दे यांना तर MD INDIA आरोग्य सेवेसाठी एकमात्र विशेष कार्यगौरव पुरस्कार गणेश कापडणीस यांना देण्यात आला.

अर्जुन शेगोकार यांना गुणवंत पुरस्कार देतांना अ नगर मंडळ अधिक्षक अभियंता सांगळे, प्रशांतजी अडभाई ,माने छाया - चंद्रकांत कदम 

दरवर्षी १मे कामगार दिनाच्या दिवशी महावितरण कंपनीतर्फे अख्खा महाराष्ट्रातून उपविभागीय स्तरातून एक गुणवंत तंत्रज्ञ कामगाराची निवड करण्यात येते,पण यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे लाँकडाउन होते. त्यामुळे सदर कार्यक्रम हा परिमंडळ स्थरावरू स्थानिक मंडळ पातळीवर घेण्यात आले. नाशिक परिमंडळात १५ आँगस्ट स्वांत्रदिनाच्या निमित्ताने, यावर्षीचे पारनेर उपविभागाकडून अर्जुन एकनाथ शेगोकार व नगर ग्रामीण उपविभागातून अशोक श्रीधर पांगरे यांना अहमदनगर जिल्हा मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोषजी सांगळे यांच्या हस्ते देण्यात आला. तर नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता दारोली यांच्या हस्ते श्री गणेश कापडणीस यांना MD INDIA चे महावितरण कंपनीतील अधिकारी, अभियंता, व कर्मचारी यांच्या आरोग्य सेवेसाठी विषेश गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार देतांना अधिकारी सर्वश्री प्रशांत अडभाई ,देशमुख, सतिष माने, गौरव चरडे हजर होते, यावेळी कोविड १९ संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टंगशिनचा वापर करत, संपूर्ण महावितरण मधिल प्रत्येक मंडळ स्तरावर सर्व गूणवंतांचे प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

तसेच भारतीय कामगार सेनेचे केंद्रीय सहसरचिटणीस प्रशांत लबडे पाटील,कार्याध्यक्ष प्रशांत शेंडे,केंद्रिय संघटक महावितरण युनिटचे ललित शेवाळे यांच्या सह विठ्ठल धायगुडे, किरणराजे मरकड, दिपक सानप, भाऊसाहेब निजवे, मनोहर इंगळे,राजेश जाधव,योगेश निकम यांनी महावितरण कंपनीच्या कामगाराचा होणार्‍या कार्यगौरवाचे स्वागत करत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.