Breaking News

भारतासारखे क्रिकेट वेडे फॅन्स शोधून सापडणार नाहीत !

 World Cup 2019 final tickets: James Neesham requests India fans to ...

बरेच खेळ भारतात खेळले जातात. देशातील अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये अनेक महान खेळाडू असले तरी या सर्वांमध्ये क्रिकेटला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. देशभरात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत आणि हजारो प्रेक्षक आपला आवडता खेळाडू पाहण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात जातात. हे सर्व प्रेक्षक मैदानावर आपल्या खेळाडूंचे आणि संघाचे समर्थन करतात आणि सामन्याचा मनमुराद आनंद लुटतात.

या लेखात जाणून घेणार आहोत की, भारतीय क्रिकेट चाहते जगातील इतर देशांच्या चाहत्यांपेक्षा का वेगळे आहेत.

सामन्यादरम्यान संघाला मोठ्या आवाजात प्रोत्साहन देतात

भारताच्या सामन्यादरम्यान क्रिकेट मैदानावर आलेल्या प्रेक्षकांचा उत्‍साह बघण्यासारखा असतो. प्रत्येक सामन्याला हजारो चाहते मैदानावर येतात. देशातील बर्‍याच सामन्यांची तिकिटं बरेच दिवस अगोदर विकले जातात आणि मग फारच कमी जागा रिक्त राहतात. सामन्यादरम्यान प्रेक्षक आपल्या संघाला आणि आवडत्या खेळाडूंना मोठ्या आवाजात प्रोत्साहन देतात.

मागील टी-२० विश्वचषकात बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांचा हा शानदार रूप पाहायला मिळाले. या सामन्यात प्रेक्षक विराट कोहलीच्या नावाचा जयजयकार करीत होते, परंतु एका घटनेनंतरच सर्वांनी भारतीय संघाच्या नावाने जयजयकार करण्यास सुरवात केली. यात सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

परदेशी खेळाडूंना देखील देतात भारतीय प्रेक्षक आदर

भारतीय क्रिकेट चाहतेदेखील परदेशी संघातील खेळाडूंचा देखील पूर्ण आदर करतात. शेवटच्या टी- २० विश्वचषक स्पर्धेदरम्यानही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांचे दुसरे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, असे असूनही भारतीय चाहत्यांनी वेस्ट इंडिजचे विश्वचषक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. बऱ्याच सोशल साइट्सवरही भारतीय चाहत्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल पूर्ण आदर व्यक्त केला आहे. तसेच अनेकदा एबी डिविलियर्स, ब्रेंडन मॅक्यूलम, केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, अशा अनेक स्टार परदेशी खेळाडूंचे चाहते भारतात असल्याचे आढळते.

फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट

भारतात क्रिकेटला एक धर्म म्हणूनही पाहिले जाते. लोक नेहमीच क्रिकेटबद्दल विचार करतात. ते सामना पाहतात आणि कोणताही सामना नसतानाही ते क्रिकेटचे लेख आणि बातम्या वाचत असतात. एवढेच नाही तर अनेकदा क्रिकेटबद्दल खुलेपणाने चर्चाही करतात आणि त्यांची मते मांडतात. प्रत्येकवेळी क्रिकेटबद्दलची उत्सुकता कायम असते. ही उत्सुकता लहान मुलापासून ते प्रौढांपर्यंत पहायला मिळते.

क्रिकेट हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे

क्रिकेटबद्दल भारतीय लोकांची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकदा भारतीय चाहते क्रिकेटला आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानतात आणि काम कितीही महत्त्वाचे असले तरी ते कामापेक्षा क्रिकेटला प्राधान्य देतात. कधीकधीतर एखाद्या सामन्यातील रोमांच पाहुन बर्‍याच कंपन्या आणि महाविद्यालये ही वेळासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ब्रेक देतात. काही महत्त्वाच्या सामन्यांवेळी तर रस्ते ओस पडलेलेही भारतात दिसतात.


भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशवारीही करतात भारतीय प्रेक्षक -

भारतातील सामन्यात तर भारतीय चाहत्यांचा जोश पहायला मिळतोच, पण त्याचबरोबर परदेशातही भारतीय चाहते आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात. मागील काही वर्षात तर परदेशातील सामन्यांदरम्यानही स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांची संख्या भरपूर दिसून आली आहे.