Breaking News

बहिरवाडीतील बेकायदा वाळू उत्खनन मुळ पंचनामा गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश !

बहिरवाडीतील बेकायदा वाळू उत्खनन मुळ पंचनामा गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश !
नेवासा तालुका प्रतिनिधी :-
    तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मुळ पंचनामा गहाळ केला प्रकरणाची तक्रार तपासून उचित कार्यवाही  करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

माहिती अधिकारी कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी दि.12 मार्च 2020 रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मुळ पंचनामा गहाळ करून नेवासा तहसील कार्यालयाने  बनावट पंचनामा केला असल्याची  तक्रार  केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे आदेश दिले आहेत.

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मध्ये 1200 ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन झाल्याचा पंचनामा एक मंडळअधिकारी व चार तलाठी यांचे संयुक्त पथकाने केला होता.मात्र नंतर हा मूळ पंचनामा गायब करून केवळ 118 ब्रासचा बनावट पंचनामा तयार करून मुळ पंचनाम्याच्या सत्यप्रती नष्ट केल्या.महसूल विभागाचे नुकसान करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी काकासाहेब गायके यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचे कडे केली होती.