Breaking News

कोपरगाव युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस समन्वय बैठक उत्साहात संपन्न !

कोपरगाव युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस समन्वय बैठक उत्साहात संपन्न


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात,युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर व तालुका युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस ची समन्वय बैठक सोशल डिस्टनसिंग पाळून कोपरगाव येथे जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर,जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीनराव शिंदे,शहराध्यक्ष सुनीलभाऊ साळुंके,तालुका काँग्रेसचे विजय जाधव,युवक काँग्रेसचे राजू बोरुडे,कोपरगाव तालुका युवक काँग्रेस समन्वयक संदीप पुंड,विद्यार्थी काँग्रेस समन्वयक शेखर सोसे तसेच एनसयुआय शहराध्यक्ष निरंजन कुडेकर,अल्पसंख्याक जिल्हा सचिव राजूभाई पठाण,लक्ष्मण फुलकर,युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते,सोशल मीडिया समनव्यक दादा आवारे यांच्या उपस्थितीत पार पडली सदर बैठकीत सुरवातीला काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.बालचंदभाई लकारे,काँग्रेस शहर उपाध्यक्ष स्व.भाऊसाहेब पगारे व स्व.शामराव लकारे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली आगामी काळात पक्षाची रणनीती व संघटना बांधणी यावर चर्चा झाली तसेच सध्या रिक्त असलेले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष या विषयावर संगनमताने निर्णय घेन्यात आला की येत्या काळात सदर पदे योग्य व्यक्तीला देऊन संघटना बळकटीकरण करण्यात येईल.तसेच शहर उपाध्यक्ष पदी सचिन दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली.येणाऱ्या काळात युवक व विद्यार्थी काँग्रेस ची मोट प्रत्येक रविवारी मोटार सायकलवर सर्व पदाधिकारी तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन ग्रामपंचायत निवडणुकीत 2 व 3 नंबर ला राहिलेल्या पराभूत युवक व उमेदवारांना तसेच पक्षाच्या विचारातील लोक जोडून त्यांना भेटून  नगरपालिका प्रभाग वाईज,जिल्हा परिषद,पंचायत समिती गट-गण वाईज नियुक्त्या तसेच विचाराने एकत्र येणारे निवडणूक काळात कुणाच्या दबावाला आमिषाला बळी न पडणारे लोक,युवक जोडून प्रत्येक बूथ वर किमान पाच लोक जोडण्याचा संकल्प करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे तुषार पोटे म्हणाले,बैठक उत्साहात पार पडली