Breaking News

तहसीलदार ज्योती देवरे यांनी घोषित केलेल्या बंदचे काटेकोरपणे पालन.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी घोषित केलेल्या बंदचे काटेकोरपणे पालन.
-------------
पारनेर शहरांमध्ये बंदमुळे पूर्ण शुकशुकाट!
-------------
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहर बंद निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत.
------------


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढली तसेच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने ही चिंतेची बाब असल्याने कोणत्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका अन्यथा ते जीवावर बेतेल यासाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष द्या व पारनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लक्षणांसाठी व तपासणीसाठी तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले होते त्या धर्तीवर गुरुवारी पारनेर शहर कडेकोट बंद पाळण्यात आले यावेळी सर्व व्यापारी व व्यवसायिक यांनी आपले सर्व दुकाने बंद ठेवली होती सर्व बाजारपेठा बंद होत्या त्यामुळे शहरामध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला.


दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ही वाढती रुग्ण संख्या व त्यामुळे होणारा संसर्ग रोखण्यासाठी तसेच शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीन व्यवसायिक व एक नगर पंचायत कर्मचारी यांचा मृत्यू झाला तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले  त्यामुळे शहरातील नागरिकांकडून व विविध स्तरावरून शहर बंद ठेवावे अशा प्रकारची मागणी जोर धरत होती तसेच काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याबाबत घोषित केले होते  तहसीलदार ज्योती देवरे यांनी नागरिकांची ही मागणी व शहरांमध्ये सोशल डिस्टन्स व इतर नियमावलीचे होत नसल्याने तीन दिवसांसाठी शहर बंद ठेवण्याचे आदेश दिले या आदेशाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले व गुरुवारी नागरिकांनी शहरांमध्ये विनाकारण फिरणे टाळले घराबाहेर पडणे ही टाळले यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
पारनेर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्यातून विविध ठिकाणी लोक आपल्या कामानिमित्त याठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र आज सर्वच कामकाज बंद असल्याने त्या गर्दीला ही आळा बसला याबाबत पारनेर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 अशा प्रकारचे जर नागरिकांनी काटेकोरपणे कोरोना काळात पालन केले तर संसर्ग वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो मात्र तसे होताना दिसत नाही प्रशासनाने नियम व आदेश दिले तरच त्याचे पालन होते याकडे देखील आता नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे तरच शहरातील कोरोना रुग्णांना आळा बसू शकतो.

    शहरांमध्ये वाढत असलेल्या रुग्ण संख्या होत असलेल्या मृत्यूमुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी घोषित केलेल्या तीन दिवसाच्या कडेकोट बंद ला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे  शहरातील सर्व व्यापारी व्यवसायिकांनी बाजारपेठा किराणा दुकानदार यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत शहरातील सर्वच व्यवहार बंद आहेत सकाळपासूनच शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता.