Breaking News

म्हसोबा झाप येथे विनापरवाना वाळू वाहतूक करताना डंपर ताब्यात, एकास अटक !

म्हसोबा झाप येथे विनापरवाना वाळू वाहतूक करताना डंपर ताब्यात, एकास अटक !
पारनेर प्रतिनिधी -
        पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप शिवारामध्ये विनापरवाना बेकायदा डंपर मध्ये वाळू भरून चोरुन वाळूची वाहतूक करत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये डंपर ताब्यात घेतला आहे तर दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
        पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि ८ रोजी पहाटे ५: ३० वाजता म्हसोबा झाप गावच्या शिवारात तालुका पारनेर येथे आरोपी अनिल देवराम झावरे वय २८ वर्षे राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर व पप्पू उर्फ गोवर्धन गुंड (पूर्ण नाव माहित नाही) राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर यांनी संगनमत करून आरोपी अनिल देवराम झावरे याने आरोपी पप्पू उर्फ गोवर्धन गुंड याच्या सांगण्यावरून एक पांढरे व निळ्या रंगाचा डंपर त्याचा पासिंग नंबर एम एच १६ ए.वाय यामध्ये विनापरवाना बेकायदा त्याच्या ताब्यातील डंपरमध्ये वाळू भरून चोरून वाळूची वाहतूक करताना पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिळून आला आहे.
       याबाबत पो.कॉ.सत्यजित सोनाजी शिंदे पोलीस स्टेशन पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे डंपर किंमत१६,६०,००० त्यामध्ये ०४ ब्रास वाळू पोलीस कारवाईत ताब्यात घेतली आहे तसेच आरोपी अनिल देवराम झावरे यास अटक केली आहे. या कारवाई मध्ये पोलिस नाईक संतोष शेळके पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे सत्यजित शिंदे यांनी सहभाग घेतला होता. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल एस. एच.  भिंगारदिवे करत आहेत.