Breaking News

श्रीगोंदे तालुक्यात कोरोनाचे सात बळी; आज शहरात एक ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु !

श्रीगोंदे तालुक्यात कोरोनाचे सात बळी; आज शहरात एक ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु !
----------------
आज एकुण १४ रुग्णांची वाढ शहरात ३ तर तालुक्यात ११ रुग्ण
----------------
 श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी :
     श्रीगोंदे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असुन कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होतो आहे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने तालुक्यासह प्रशासनाची चिंता वाढतच चालली असुन यातच श्रीगोंदा शहरातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे ही व्यक्ती मिळुन आता तालुक्यातील मृत्युंची संख्या सात  वर पोहचली आहे. 
      आज तालुक्यात एकुण १४ रुग्णांची वाढ झाली यामध्ये श्रीगोंदा शहर पंतनगर १, लक्ष्मी नगर १, पंचायत समीती समोर १, पिंपळगाव पिसा ७,  घारगाव २, जंगलेवाडी १, श्रीगोंदा कारखाना १ असा सामावेश आहे. श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ३८६ इतकी झाली असुन सध्या ८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर २९८  रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ७ जणांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती डॉ नितीन खामकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.