Breaking News

गोदावरी नदी वरील लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे धोका !

गोदावरी नदी वरील  लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे धोका !


कोपरगाव/लक्ष्मण वावरे  
कोपरगाव शहरात असलेल्या गोदावरी नदी वरील  लहान पुलाला अवजड वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला असून कोपरगाव   नगर पालिकेने अवजड वाहतूक होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या असताना हि अवजड वाहतूक करणाऱ्या वाळू डंपर मुळे पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असुन पुलाचा असलेला सांगाडा ढीला होत असल्याने पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


     गोदावरी नदी वर मा.आ. अशोक काळे यांनी  पाठपुरावा करुन हा कोट्यवधी रुपये खर्च करून पुलाची उभारणी १० वर्षापुर्वी केली  या मागे जनहिताची भुमिका होती मात्र त्या नंतर या पुलावरून अवजड वाहतूक होणार नाही यासाठी काळजी घेतली पण गेल्या काही वर्षांत या पुलावरून रात्री बेरात्री वाळु तस्कर मोठ्या प्रमाणावर डंपर  ने आण करतात शहरात येणारा व बाहेर जाणारा कोपरगाव शहरातील गोदावरी नदी वरील एकमेव पुल असताना पोलिस प्रशासन फार काही कारवाई करत नाही व नगर पालिका देखील कमकुवत गल्डर टाकुन प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत असताना वाळु तस्कर डंपर ने धडक देऊन पाडुन टाकत असल्याने आता या पुलावर असलेल्या जोडालाच धोका निर्माण झाल्याचे दिसून येत असल्याने हा पुल धोकादायक ठरू शकतो यामुळे जिवीत हाणी देखील होऊ शकते कोपरगाव शहरात असणारा हा महत्त्वाचा गोदावरी नदी वरील पुलाचे आयुष्य मान कमी होत असल्याने या गंभीर प्रकरणात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी व कोपरगाव नगर पालिकेने अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.