Breaking News

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

 coronavirus Almora also became corona free in uttarakhand
मुंबई - राज्यात आज दिवसभरात 6165 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 10,309 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे. तर सध्या 1 लाख 45 हजार 961 रुग्णांवर (ऍक्‍टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 24 लाख 13 हजार 510 नमुन्यांपैकी 4 लाख 68 हजार 265 नमुने पॉझिटिव्ह (19.40 टक्के) आले आहेत. राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 334 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण 334 मृत्यूंपैकी 242 मृत्यू हे मागील 48 तासांतील, तर 60 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 32 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.