Breaking News

अभिनेता सुशांतसिंहचा खूनच!

अभिनेता सुशांतसिंहचा खूनच!
- सुब्रमण्यम स्वामी यांनी नितीश कुमार यांना दिले दस्तावेज
- सीबीआय चौकशीची मागणी ऐरणीवर
नवी दिल्ली/ प्रतिनिधी
प्रसिध्द अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू ही आत्महत्या नसून, तो खून असावा, असे ठाम मत भाजप नेते व खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. डॉ. स्वामी यांनी एक ट्वीट केले व अशी शंका घेण्याचे २४ मुद्दे मांडणारा एक छापील दस्तावेज त्यासोबत प्रसिद्ध केला. स्वामी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या मृत्यूचा 'सीबीआय' तपास व्हावा, यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे त्यांना सांगितले होते.
डॉ. स्वामी यांनी ट्वीटसोबत जोडलेल्या दस्तावेजात एकूण २६ मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी २४ मुद्यांवरून ही आत्महत्या नव्हे, तर खून असावा, अशी दाट शंका येते, असे त्यांचे म्हणणे आहे. स्वामी यांनी म्हटले आहे की, सुशांतसिंहच्या मृतदेहाच्या मानेवरील खूण फाशी घेतल्याची नव्हे, तर दिल्याची भासते आहे. त्याची जीभ किंवा डोळे बाहेर आले नव्हते. तोंडाला फेस न येणे, फासासाठी वापरलेल्या कापडाची लांबी पार जमिनीपर्यंत पोहोचेल एवढी होती. ज्यावर चढून व नंतर पायाने ढकलून फास लावून घेता येईल, असे छोटे स्टूल किंवा खुर्ची त्या खोलीत आढळले नाहीत. त्यावेळी सीसीटीव्ही बंद होता, खोलीची ड्युप्लिकेट चावी गायब होती. नोकरांनी उलटसुलट जबाब दिले. जवळच्या मित्रांपैकी कोणीही आत्महत्येविषयी शंका घेतली नाही. सुशांतसिंहने वारंवार सीमकार्ड बदलली होती. त्याच्या घरातून मृतदेह नेताना शववाहिका बदलली गेली आणि कूपर हॉस्पिटलमध्येच जाण्याचा आग्रह धरला गेला होता. सुशांंतसिहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारे पत्र सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. दुबईतील डॉनच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील काही बडे लोक या आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशीची मागणी त्यांनी केली होती
-------------------------------------