Breaking News

वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुका आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण; त्यातच व्हेंटिलेटर कमतरता !

वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुका आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण; त्यातच व्हेंटिलेटर कमतरता
----------
तालुक्यातील नागरिकांनी अजूनही सावध व्हावे
---------
 व्हेंटिलेटर या सुविधेसाठी तालुक्यात खाजगी रुग्णालयात जागा उपलब्ध नाही उपचारासाठी अन्यत्र करावे लागत आहे रुग्णांना दाखल.


शशिकांत भालेकर पारनेर - 
    पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वेगात वाढत आहे सुरुवातीच्या काळामध्ये अनेक दिवस तालुका कोरोना पासून अलिप्त होता मात्र त्यानंतर कोरोना रुग्णांची सुरुवात झाली ती सध्या झपाट्याने वाढत आहे अनेक रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसतात तर काही कोरोना रुग्णांना लक्षणां बरोबरच त्रासही होतो तर त्यांना व्हेंटिलेटर ची गरज भासते मात्र तालुक्यामध्ये फक्त ऑक्सिजनची सुविधा आहे जर व्हेंटिलेटर ची सुविधा लागली तर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे तसेच तालुक्यात ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर साठी खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या जागा उपलब्ध नाही म्हणून रुग्णांना इतरत्र शहरात दाखल करावे लागत आहे.
 तालुक्यात शासकीय कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना खाजगी रुग्णालयात भरती करतात व तेथे लाखो रुपयाचे रुग्णांकडून बिल उकळले जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून सांगितले जात आहे जिल्हाधिकारी यांनी नुकतेच या संदर्भात बिलाचे ऑडिट होणार आहे असेल जाहीर केले असले तरी नेमके ते कशाप्रकारे होईल याबाबत अजून अनिश्चितता आहे


पारनेर तालुक्यामध्ये एकूण रुग्ण संख्या 600 पार गेली आहे त्यातील अनेकांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे तर काही उपचार घेत आहेत दररोज संख्याही वाढत आहे त्यात यामध्ये अलीकडल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे तालुक्यात असणारे कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे  ज्या रुग्णांना जास्त त्रास होत आहे असे रुग्ण नगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हलवले जात आहेत तर अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णांची तब्येत खालवल्या नंतर त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र अनेक खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने तसेच व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे तालुक्यात अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सुविधा नाही ठराविकच सुपा व भाळवणी येथेच व्हेंटिलेटर सुविधा असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत मिळाली आहे त्यामुळे तेथेदेखील रुग्णांसाठी जागा उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना रुग्णांना कोणत्या हॉस्पिटल उपचारासाठी न्यावे याबाबत समस्या निर्माण होतात व अशातच काही खाजगी हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवास्तव डिपॉझिट  व  बिलाची मागणी केली जाते तालुक्यांमध्ये सुपा येथे ओंकार हॉस्पिटलमध्ये 2 व निरामय हॉस्पिटल मध्ये 1 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे तर भाळवणी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे तालुक्यामध्ये फक्त चारच व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था आहे व तेथेही आता सध्या बेड उपलब्ध नाही त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांना   व्हेंटिलेटर सुविधा पाहिजे असेल तर शिरूर किंवा अन्य ठिकाणी दाखल करावा लागत आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी देखील व्हेंटिलेटर बेड अनेक वेळा उपलब्ध नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात येते त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर अजून रुग्णांची संख्या वाढत गेली तर ऑक्सीजन व्हेंटिलेटर सुविधा सहज उपलब्ध होणे मुश्कील होऊ शकते यासाठी नागरिकांनी वेळीच दखल घेणे गरजेचे असून कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर नियमित झाला पाहिजे शक्य तेवढे कोरोना पासून दूर राहिले तरच स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित केले जाऊ शकते अन्यथा अनेक समस्यांना भविष्यात तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे तालुक्यात सध्या सोशल डिस्टन्स अनेक ठिकाणी फज्जा उडताना दिसत आहे लोक कोरोना काळात बिनधास्त वावरत आहेत मात्र कोरोना झालेल्या कुटुंबाची अवस्था खूप दयनीय होत आहे याकडे देखील आता तालुक्यातील नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
------------------------------
    शासनाच्या नियमानुसार ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर सुविधा नसते जरी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध झाली तरी त्यासाठी उच्चशिक्षित तज्ञ डॉक्टर लागतात त्याशिवाय ते ऑपरेट करता येत नाही तालुका आरोग्य यंत्रणेला सध्या तरी ते शक्य नाही तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा मोजक्या स्वरूपात आहे त्यामुळे सध्यातरी नगर शासकीय रुग्णालयात ज्या रुग्णांची तब्येत जास्त खराब होते त्यांना पाठवावे लागत आहे व तेथे त्यांच्यावर उपचार होत आहेत.
--------
डॉ.प्रकाश लाळगे 
तालुका आरोग्य अधिकारी पारनेर

     तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे त्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे  मात्र अनेक वेळा नागरिक लक्षणे असूनही चार-पाच दिवस अंगावर दुखणे काढत आहेत त्रास सुरू झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जातात त्यातील काहींना पुढे व्हेंटिलेटरची गरज भासू शकते त्यामुळे वेळीच रुग्ण शासकीय आरोग्य यंत्रणा च्या संपर्कात आला तर वेळीच निदान करता येईल व उपचार सुरू करता येतील व त्याला व्हेंटिलेटर ची गरज भासणार नाही तसेच ज्या नागरिकांना लक्षणे दिसतील त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क केला पाहिजे.
---------------
ज्योती देवरे
तहसिलदार पारनेर