Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज कोरोनाचा कहर ६५ रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात आज कोरोनाचा कहर ६५ रुग्णाची भर
करंजी प्रतिनिधी- 
आज कोपरगाव तालुक्यात एकूण  ६५ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   आज कोपरगाव कोविड  केअर सेंटर मध्ये एकूण २५८ संशयितांची रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी केली असता त्यात तब्बल ६१ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले व १९७ अहवाल निगेटीव्ह आले असून  यात संजीवनी कारखाना व कॉलेज परिसरात-१४, शिंगणापूर-५, ब्राह्मणगाव-3, शिरसगाव-१, पोहेगाव-२,चांदेकसारे-१, देवगाव-१, येसगाव-२, सडे-४, सांगवी भुसार-२, कोळगाव थंडी-१, निमगाव-१, रवंदे-१, टाकळी-२, मंजूर-१, सोनई-१, डाऊच बु-२, देर्डे कोराळे-१, आचलगाव-१,देर्डे चांदवड-१, आपेगाव-१, कोकमठांन-१, कारवाडी-१ तसेच कोपरगाव शहरातील  निवारा-२, समतानगर -३,साई लक्ष्मीनगर -१, टिळेकर वस्ती-१, येवला रोड-१, गांधीनगर-१,धारणगाव रोड-१,टाकळी फाटा-१ असे तब्बल ६१ रुग्ण रॅपिड टेस्ट द्वारे सापडले आहे.
  तसेच ब्राह्मणगाव येथील २ रुग्ण खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार पॉजिटीव्ह आले तर आज सकाळी आलेल्या नगर  सिव्हिल हॉस्पिटल च्या रिपोर्ट नुसार खडकी व शिंगणापूर येथील दोन रुग्ण आढळुन आले होते असे आज एकूण तालुक्यात ६५ कोरोना रुग्ण सापडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे
  आज ६ ऑगस्ट अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या २७७ झाली आहे.