Breaking News

देवळाली प्रवरातील राजकीय क्षेञातील पिता-पुञाला कोरोनाची बाधा !

देवळाली प्रवरातील राजकीय क्षेञातील पिता-पुञाला कोरोनाची बाधा 
देवळाली प्रवरा  प्रतिनिधी :
            देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेत्रातील पिता- पुत्रांना गुरवारी  कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
                    देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरी परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे एकूण १२ रूग्ण सापडले असता त्यातील ११ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील एकावर अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोना रूग्ण सापडले नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला होता.
                 दरम्यान देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पिता- पुत्रांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ व मुख्याधिकारी  अजित निकत यांनी सांगितले.