Breaking News

शासनाच्या 'महसूल' विभागाचा पुरव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढल्याने वाळू चोरांनी दिली सामाजिक कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी !

शासनाच्या 'महसूल' विभागाचा पुरव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढल्याने वाळू चोरांनी दिली सामाजिक कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यातील शासनाच्या 'महसूल' विभागाचा भ्रष्टाचाराचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढल्याने सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायके या सामाजिक कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी तालूक्यातील वाळू तस्करांनी दिल्या प्रकरणी गायके यांनी राज्याच्या गृह खात्याकडे तक्रार दाखल केली असून वाळू तस्कर मला ठार मारण्याचा धोका असल्याने मला शासनाच्यावतीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी गायके यांनी शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर केली आहे.
    याबाबत गायके यांनी म्हटले आहे की, मी जिल्ह्यातील विविध प्रकारचे शासनाचे पुराव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत तर काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ आहेत. काही प्रकरणाची शासनस्तरावर चौकशी सुरु आहे.
   नेवासा तालूक्यातील गौणखनिज संपत्तीची चोरी करणारे काही दलालांनी घरी येवून मला संबंधित प्रकरणे मागे घे ? अन्यथा तुला उचलून नेवून जीवे ठार मारु अशी धमकी दिल्याने माझ्या जीवीताला वाळू तस्करांपासून धोका असून धोका असून शासनाने मला स्वखर्चाने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
    नेवासा तालूक्यात बेकायदेशीर गौणखनिज (वाळू) वाहतूक करतांनी अनेक वाहने पकडलेले असून परंतू महसुल कर्मचारी व अधिकारी यांनी दंड न घेता अनेक वाहने परस्पर सोडून देण्यात आलेली आहेत तसेच तहसिल कार्यालय नेवासा यांनी वाळूचा पंचनामाही गायब करुन खोटे दस्तऐवज तयार केले आहे या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंञी व महसूल मंञी यांनी चौकशी लावलेली आहे. व जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचा आदेशही देण्यात  आलेला आहे त्यामुळे नेवासा तालूक्यातील वाळू तस्कर मला या प्रकरणी माघार घे अन्यथा तुला जीवे ठार मारु अशी धमकी देतात,त्यामुळे माझ्या जिवीताल वाळू तस्करांपासून धोका आसून कोट्यावधी रुपयांचा महसूल त्यांनी बुडविल्यामुळे मला जीवे ठार मारण्याची धमकी मिळत आहे तरी आपण शासना मार्फत पोलिस संरक्षण देण्यात यावे अन्यथा माझा जीव जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील याची अशी तक्रारही गायके यांनी 'आपले सरकार' पोर्टलवर नोंदविली आहे.