Breaking News

गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा DNA आहे - यशोमती ठाकूर !

कांग्रेस की महिला विधायक यशोमती ...

 मुंबई : गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा 'डीएनए' आहे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या घुसळणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली.

या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, 'गांधी हे केवळ एक कुटुंब नाही तर तो भारताचा डीएनए आहे. जर सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे. देशाला राहुल गांधी यांची गरज आहे,'असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.