Breaking News

गाडीला कट मारला म्हणून दागिन्यांसह 1 लाख 30 हजार रुपये चोरून लाथाबुक्क्यांनी केली मारहाण!

गाडीला कट मारला म्हणून दागिन्यांसह 1 लाख 30 हजार रुपये चोरून लाथाबुक्क्यांनी केली मारहाण!
------------
पारनेर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण व चोरी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल.
----------


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील दादाभाऊ सुभाष शिंदे यांना घरी जात असताना जामगाव येथील प्राथमिक शाळा येथे अडवून पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांने व रोख रक्कम असे एकूण एक लाख तीस हजार रुपये चोरून नेले याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दादाभाऊ सुभाष शिंदे वय तीस वर्ष धंदा लँड डेव्हलपर्स व शेती राहणार दैठणे गुंजाळ यांनी दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दादाभाऊ सुभाष शिंदे
हे प्राथमिक शाळा जामगाव येथे ब्रीजा गाडी क्रमांक  एम एच 16 बी एम  47 41  मधून घरी जात असताना  मागून आलेल्या पांढरे रंगाची अल्टो कार मधील प्रकाश पवार गणेश माळी पूर्ण नाव माहीत नाही राहणार जामगाव तालुका पारनेर व इतर 3 अनोळखी  आरोपी  पवार व त्याचे सोबत असलेले  तीन अनोळखी इसम  व काळे रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेला गणेश माळी  राहणार जामगाव तालुका पारनेर याने गाडीला कट मारला असे म्हणून   गाडी थांबवण्यास सांगितली  दादाभाऊ सुभाष शिंदे यांनी गाडी थांबवली व  गाडीतुन खाली उतरवले त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपी  प्रकाश पवार  याने शिंदे यांच्या गळ्यातील  सोन्याची चैन  व आरोपी गणेश माळी याने  पॅन्टच्या  खिशातील  25000 रु बळजबरीने काढून घेतले  व तुला  आता जिवंत सोडणार नाही  अशी धमकी देऊन आरोपी  त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार  व काळा रंग पल्सर  मोटरसायकलवर  जामगाव कडे निघून गेले शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बालाजी पद्मने करत आहेत.