Breaking News

अकोल्यात कोरोना चा 12 वा बळी!

अकोल्यात कोरोना चा  12 वा बळी!


अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात कोरोना  विषाणू ने   यापूर्वी 11 बळी गेले आहे तर  तर आज राजूर येथे आणखी एकाचा बळी गेल्याने  करोन बळींची संख्या 12 झाली आहे.
 राजुर येथील ५७ वर्षीय महीलेच्या रूपाने तालुक्यातील कोरोनाने १२ वा बळी गेला. आहे आज गुरुवारी अकोले तालुक्यात  १६ नवीन करोना पिझिटिव्ह रुग्ण आढळले आहे 
       सकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ८० वर्षीय महीलेचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील शाहूनगर येथील ३२ वर्षीय पुरुष,पाडाळणे येथील ७५ वर्षीय पुरूष,२६ वर्षीय तरुण, १७ वर्षीय युवती,शेंडी येथील २५ वर्षीय तरुण,टाहाकारी येथील ४५ वर्षीय पुरूष,१८ वर्षीय युवती,२१ वर्षीय महीला,समशेरपुर येथील ५५ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात धामणगाव पाट येथील २७ वर्षीय तरुण,६४ वर्षीय पुरूष, वरखडवाडी (देवठाण) येथील २६ वर्षीय तरुण,टाकळी येथील ४१ वर्षीय पुरूष, तांभॊळ येथील ४० वर्षीय पुरुष अशा आज एकुण १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.यामुळे तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ७५९ झाली आहे.आत्तापर्यंत ६१६ कोरोना रुग्ण  उपचार करून बरे होऊन घरी गेलेत.तर  १२ व्यक्तीचा मृत्यू झाला असून १३१ रुग्ण  उपचार घेतआहे.

-----