Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात 13 अहवाल पॉझिटिव्ह 42 निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात 13 अहवाल पॉझिटिव्ह 42 निगेटिव्ह

कोरोना चाचणीसाठी किट उपलब्ध नसल्याने दिवसभरात चाचण्या झाल्या नाही

तपासणीसाठी किट उपलब्ध नसल्याने संशयित नागरिकांना नाहक मनस्ताप


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यातील एकूण 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 42 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज दिवसभरामध्ये रॅपिड किट उपलब्ध नसल्याने चाचण्या झाल्या नाहीत त्यामुळे आकडेवारी कमी आली आहे अनेक संशयितांना चाचण्या शिवाय माघारी परतावे लागले आहे.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये पारनेर शहर 6 सुपा 2 गोरेगाव 1 पिंपळगाव 1 वासुंदे 1 टाकळीढोकेश्वर 1 कळस 1 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तर निगेटिव्ह अहवालामध्ये पारनेर शहर 11 हतलखिंड 3 कान्हूर पठार 9 कुरूंद 1 कळस 3 वासुंदे 2 सुपा 2 काळकुप 1 टाकळीढोकेश्वर 4 भाळवणी 4 जवळा 1 वडगाव सावताळ 1 या गावातील व्यक्तींचा निगेटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
पारनेर तालुक्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णां ची संख्या वाढत आहे तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक हजार च्या जवळ पोहोचली आहे रुग्ण संख्या वाढत असताना तालुक्यातील नागरिक अद्यापही याबाबत गांभीर्याने घेत नाहीत अनेक गावामध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन न करता मोठी गर्दी होत आहे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत आहेत.
आज दिवसभरामध्ये रॅपिड किट संपले असल्याने रॅपिड चाचण्या होऊ शकल्या नाहीत तसेच शासकीय लॅब साठी घशाचे स्त्राव घेण्यासाठी किट उपलब्ध नसल्याने अहवाल गेले नाही आज दिवसभरामध्ये अनेक कोरोना संशयितांना किट उपलब्ध नसल्याने चाचणी होऊ शकली नाही वरिष्ठ पातळीवरूनच किट उपलब्ध होत नसल्याने तालुका प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत कोरोना संशयीत नागरिक चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे संपर्क करीत आहेत मात्र चाचणी साठी किट उपलब्ध नसल्याने आरोग्य विभाग देखील हतबल आहे वरिष्ठ पातळीवरून लवकरच किट उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळत आहे मात्र तोपर्यंत संशयित नागरिकांनी काय करायचे याचे उत्तर प्रशासनाकडे नाही यामुळे कोरोना संशयित लोक एकमेकाच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढली आहे यामुळे तालुक्यात कोरोना चा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे किट उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल कोरोना संशयीत नागरिक विचारत आहेत.