Breaking News

सुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण !

सुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
-----------------
तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक
पारनेर प्रतिनिधी -
      पारनेर तालुक्यातील सुपा येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्मल नगर खडु कारखाना पाईप लाईन रोड अहमदनगर सध्या रा.सुपा ता पारनेर येथील सतरा वर्षे तीन महिने या मुलीला दि.21 रोजी दुपारी 12:30  वाचे दरम्यान सुपा बस स्टॅन्ड च्या जवळ ता पारनेर जि अहमदनगर राहत्या घरात जवळून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले आहे याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने सुपा पोलिस स्टेशन मध्ये दि.25 रोजी दिली आहे त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले करत आहेत.
       दरम्यान पारनेर तालुक्यांमध्ये अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे तालुक्यात यापूर्वी पाच मुलींना पळवून नेले आहे या घटना ताज्या असतानाच सुपा येथील ही घटना घडली आहे पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत त्यामुळे मुलींच्या नातेवाईकांकडून पोलिस यंत्रणेने याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.