Breaking News

पारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी -  
     पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे तालुक्यामध्ये ग्रामीण भागांमध्ये देखील कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणे वाढला आहे. तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये हंगे 2 काळकुप 2 कडूस पाडळी 1 कळस 2 कान्हूर पठार 1 रुई छत्रपती 1 रांजणगाव मशीद 2 जामगाव 1 टाकळीढोकेश्वर 2 ढवळपुरी 1 सुपा 3 पाडळी आळे 1 भाळवणी 3 वडनेर हवेली 1 या गावातील व्यक्तीचा पोझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
कोरोना रुग्णांची संख्या 1460 वर पोहोचली आहे तालुक्यातील कान्हूर पठार सुपा टाकळी ढोकेश्वर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे नागरिकांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन या भागांमध्ये होताना दिसत नाही त्यामुळे दिवसेंदिवस तालुक्यात संख्या वाढत आहे गेल्या काही दिवसापासून वाढत असणारी संख्या ही स्थिर असली तरीही कोरोना रुग्णसंख्या मध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे.