Breaking News

अबब! नागपूरात गेल्या 24 तासात 1 हजार 319 जणांना कोरोनाची लागण

 Corona Studies Series' to be launched by National Book Trust

नागपूर । नागपूरात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1 हजार 319 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 44 हजार 556 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 11 हजार 532 रुग्णांवर उपचार सुरू असुन, आतापर्यंत सुमारे 1 हजार 458 जणांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सुमारे 31 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या हा आता नागपूरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.