Breaking News

गेल्या 24 तासात नागपूरात कोरोनाचा कहर; 2 हजार 343 जणांना कोरोनाची लागण !

Emerging Findings On The Impact Of COVID-19 On Black And Minority Ethnic  People - COVID-19 HUB

 नागपूर । नागपूरात कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 2 हजार 343 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 52 हजार 471 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 11 हजार 664 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आत्तापर्यंत सुमारे 1 हजार 658 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 39 हजार 149 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 2 हजार 343 अहवालांपैकी ग्रामीण भागातील 296 रुग्ण तर शहरी भागातील 2 हजार 42 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे नागपुरकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.