Breaking News

वॉलमार्ट 'या' भारतीय उद्योग समूहात गुंतवणार 25 अब्ज डॉलर?

 


बंगळुरू - टाटा समूहात रिटेल व्यवसायातील सुपर ऍपच्या माध्यमातून ई- कॉमर्स क्षेत्रात आक्रमक आगेकूच करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता टाटा समूहमध्ये अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील बलाढ्य कंपनी वॉलमार्ट तब्बल 25 अब्ज डॉलरची (१ अब्ज म्हणजे साडेसात हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त बऱ्याच वृत्त माध्यमात झळकले आहे.

असे बोलले जाते की, वॉलमार्ट व टाटा समूह हे सुपर ऍप संयुक्‍त प्रकल्प म्हणून लॉंच करणार आहेत. यामुळे टाटा समूहातील ई-कॉमर्स आणि वाल मार्टच्या आधिपत्याखालील फ्लिपकार्ट संयुक्‍तपणे अधिक ताकतीने काम करू शकतील. हे सुपर ऍप डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सादर केले जाणार आहे. या ऍपच्या माध्यमातून टाटा समूह ई-कॉमर्समध्ये आगेकूच करणार आहे.

टाटा समूह घड्याळ आणि दागिने क्षेत्रातही टायटनच्या माध्यमातून सक्रिय आहे. भारतातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टने या अगोदरच 66 टक्के भांडवलासाठी 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

आता टाटा समूहात 25 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यास ही गुंतवणूक फ्लिपकार्टपेक्षा मोठी गुंतवणूक ठरणार आहे. असे बोलले जाते की, वॉलमार्टने या व्यवहाराकरिता बॅंकरची निवड केली आहे. मात्र वृत्तसंस्थांनी टाटा समूह, वॉलमार्ट आणि यासंदर्भात विचारणा केली असता कोणाकडूनही औपचारीक प्रतिक्रिया मिळाली नाही.