Breaking News

पारनेर तालुक्यांमध्ये आज 27 अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यांमध्ये आज 27 अहवाल पॉझिटिव्ह.
---–---------
संसर्ग वाढत असताना नागरिक मात्र बेफिकीर.


पारनेर प्रतिनिधी -
       पारनेर तालुक्यांमध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या 1437 झाली 210 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत 1223 रुणांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली आहे तर 31 रुग्णांचा मृत्यू झाला आज प्राप्त झालेल्या करोना चाचणी च्या अहवालानुसार 27 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
      पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे मात्र तालुक्यातील नागरिक अद्यापही बेफिकिरी ने वागत आहेत त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्यावर उपायोजना करण्यामध्ये अतिरिक्त ताण वाढत आहे.
       प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालानुसार हंगा 8 वाढवणे 3 सुपा 1 पिंपळगाव रोठा 1 टाकळी ढोकेश्वर 1 निघोज 2 कडूस 3 कान्हूर पठार 3 आळकुटी 2 पारनेर शहर 1 जमगाव 1 भाळवणी 1 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात  समावेश आहे.
       तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामध्ये सुपा हंगा कान्हूर पठार निघोज या गावांचा समावेश आहे. तालुक्यात मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये नागरिक कोरोना बाबत निष्काळजीपणे वावरताना दिसतात त्याविरोधात पारनेर पोलिसांनी धडक मोहीम राबविली असून विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्यात येत आहे पारनेर नगरपंचायतीचे देखील शहरांमध्ये  नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.