Breaking News

पारनेर तालुक्यात आज 28 अहवाल पॉझिटिव्ह 17 निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज 28 अहवाल पॉझिटिव्ह 17 निगेटिव्ह !
------------
निघोज पारनेर शहर गुणोरे कान्हूर पठार सुपा येथे वाढत आहे कोरोना चा संसर्ग!
------------
तालुक्यामध्ये एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहचली 1048 वर !


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1048 झाली आहे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 28 व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे तर 17 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 
    पॉझिटिव्ह अहवालामध्ये निघोज 6 पारनेर शहर 3 देवीभोयरे 2 गुणोरे 4 पिंपळनेर 1 पिंपळगाव तुर्क 1 पोखरी 1 राळेगण-सिद्धी 1 म्हसणे1 टाकळी ढोकेश्वर 1 हंगे 2 कान्हूर पठार 1 सुपा 1 वासुंदे 1 हिवरे कोरडा 1 दैठणे गुंजाळ 1 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह व यामध्ये समावेश आहे.
    तर तालुक्यातील 17 अहवाल निगिटीव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये पारनेर शहर 5 जवळ 1 देवीभोयरे 2 पिंपळगाव रोठा 1 विरोली 1 रुई छत्रपती 1 आळकुटी 1 लोणीहवेली 1 निघोज 4 या गावातील व्यक्तींचा निगेटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यामध्ये रुग्ण संख्या वाढत आहे संपर्कात आलेल्या लोकांची संख्याही वाढली आहे मात्र रॅपिड व लॅब साठी स्राव घेणारे किट मर्यादित असल्याने चाचण्यांवर मर्यादा आली आहे शासन पातळीवरून चाचण्या वाढवा असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्यासाठी लागणारे साहित्य पुरेसे नसल्याने चाचण्यांची संख्या कमी होत आहे त्यामुळे अनेक कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या होत नाहीत शासन पातळीवरून लवकरच किट उपलब्ध होतील अशी माहिती आहे. आज दिवसभरामध्ये संशयित व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
    तालुक्यामध्ये रुग्ण संख्या वाढली असताना देखील नागरिक अद्यापही गांभीर्याने घेत नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये अनेक भागांमध्ये गर्दी होताना दिसत आहे त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.