Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात २९ पॉझिटिव १३ निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात २९ पॉझिटिव १३ निगेटिव्ह !
----------
पारनेर शहर जवळा कान्हूर पठार येथे वाढत आहे कोरोना चा संसर्ग !
--------
पारनेर तालुक्यातील एकूण ८५० कोरोना बाधित रुग्णांची संख्या.
---------
जिल्हा परिषद सदस्याला कोरोना ची लागण कुटुंबातील सदस्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २९ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तालुक्यातील कोरोना बाधित गावांमध्ये आळकुटी ३ जवळा २ वडगाव गुंड २ टाकळी ढोकेश्वर २ पारनेर शहर ९ सिद्धेश्वर वाडी १ गुणोरे १ सुपा २ कान्हूर पठार १ वाळवणे १ पळवे खुर्द १ भाळवणी २ हंगे १ कार्जुले हर्या १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
तर तालुक्यातील १३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये टाकळी ढोकेश्वर ३ कुरुंद २ म्हसणे २ निघोज १ जवळा १ पारनेर शहर १ आळकुटी १ जामगाव १ वडनेर १ या गावांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे.
पारनेर शहरामध्ये एकाच कुटुंबातील आज पुन्हा पाच जणांना कोरोनाची लागण झाली.
तसेच पारनेर शहरातील तहसिल कार्यालयातील व स्टेट बँक कार्यालयातील प्रत्येकी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. या दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर करण्यात आले असून सेवा सुरळीत करण्यात आली आहे. येथील कर्मचार्‍यांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
आज पारनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत ते रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.