Breaking News

पारनेर तालुक्यात काल 29 अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल 29 अहवाल पॉझिटिव्ह.
------------
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत होणार तालुक्यातील सर्व कुटुंबाचे आरोग्य तपासणी.


पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील काल रविवार दि.20 राजी रात्री पर्यत प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात 29 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 1401 वर पोहचला आहे 1086 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे सध्या 284 रुग्ण उपचार घेत असून 31 व्यक्तीचा आजाराने मृत्यू झाला आहे.
आज पोझिटिव्ह अहवालत हंगे 3 गारखिंडी 1 वाडेगव्हाण 1 हिवरे कोरडा 1 ढवळपुरी 1 लोणी हवेली 2 रांजणगाव मशीद 1डोंगरवाडी 1 भाळवणी 3 पारनेर शहर 7 सुपा 3 हिवरे कोरडा 1 निघोज2 भानगडेवाडी 2 या गावात पॉझिटिव व्यक्तींचा समावेश आहे.
तालुक्यात रुग्ण संख्या वाढताना दिसत असून नागरिक मात्र त्याबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत सध्या प्रशासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली आहे त्यामुळे अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे ज्या लोकांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील त्यांनी त्वरित आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी अशी आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
काल तालुक्यातील पंचायत समिती सभापती व राहुल शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांच्या रॅपिड चाचणीत निष्पन्न झाले आहे त्यांची प्रकृती चांगली आहे त्यांनी केलेल्या सर्व तपासणीमध्ये त्यांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत मात्र रॅपिड चाचणी पॉझिटिव आल्यामुळे खबरदारी म्हणून ते सध्या स्वतः विलगीकरण मध्ये थांबणार आहे दोघांनीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे आहे.